प्रतिनिधी , जालना : शिवसैनिकाची हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याची घटना जालना जिल्ह्यातील नागापूर शिवारात घडलीय. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलीय., जालना तालुक्यातील पाहेगाव येथील रमेश शेळके असं हत्या झालेल्या शिवसैनिकांचं नाव असून काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगितल्या जात आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेतायत. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शेळके यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय.
