प्रतिनिधी , बुलडाणा : शेगाव नगरपालिकेतील मृत्यु पावलेल्या शिपाईच्या पत्नीने अनुकंपतत्वावर शिपाई पदावर नोकरी मिळावी यासाठी 27 जानेवारी पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे..
शेगाव नगर पालिकेत भीमराव गायकवाड हे शिपाई पदावर कार्यरत होते.मात्र 2011मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यु झाला होता.त्यांच्या पश्चात पत्नीने मुलीला अनुकंपतत्वावर शिपाई या पदावर नोकरी मिळावी म्हणुन 2011 पासुन नगर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन सुद्धा त्यांना बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या प्रसिद्ध यादीमध्ये नाव नसल्याने त्यांनी 27 जानेवारी पासुन बेमुदत आमरण उपोषणाला बसल्या आहेत,जो प्रतिक्षा यादीमध्ये माझ्या मुलीचे नाव समाविष्ट करत नाही तो पर्यंत मी उपोषण सोडणार नाही अशी भूमिका पीडीत कुसुम गायकवाड यांनी घेतला आहे.
