जनतेज न्युज

इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग येथील चिमुकली स्टार शिवांजली चा इगतपुरी चे तहसीलदार यांनी केला सत्कार

प्रतिनिधी , इगतपुरी : रातोरात इन्स्टाग्राम च्या माध्यमातून स्टार झालेल्या व लाखो व्यूवर आणि चाहते मिळवणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांगची नटखट स्टार कु शिवांजली विष्णू पोरजे हिचा आज इगतपुरी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रवीण गोंडाले, नायब तहसीलदार दिनेश पाडेकर, शाम बोराडे, सुरेश भालेराव नितीन केंगळे पंकज पाटील, नंदू वारे राजू भालेराव तिचे कौतुक करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.