प्रतिनिधी , अमरावती : अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले असून या निवडणूकीत कारकुन,शिक्षकेत्तर कर्मचार्यांसह लॅब कर्मचारी आणि हॉस्पीटलच्या नर्सेसनी बोगस मतदार म्हणून मतदान केल्यामुळेच निवडणूकीचा धक्कादायक निकाल आल्याचा गंभीर आरोप शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीतील उमेदवार शेखर भोयर यांनी आज वाशिम येथील पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे.ही निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासह मुख्याध्यापक आणि निवडणूक अधिकार्यांवर गुन्हे दाखल करावे अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही शेखर भोयर यांनी दिला आहे.
