महावितरण च्या विरोधात गावकरी संतप्त
प्रतिनिधी , औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील वाकडी हे गाव गेल्या पंधरा दिवसापासून गावातील रोहित्रे जळल्यामुळे अंधारात आहे
वितरण अभियंता अविनाश कुंदे यांनी गावकर्यांकडून सक्तीची वसुली करून दोन दिवसात नवीन रोहित्रे दिले मात्र तेही जळाल्याने आता गावकरी पंधरा दिवसापासून अंधारात आहे
वाकडी येथील ग्रामविद्युत व्यवस्थापक यांनी कोरोनाच्या काळात सक्तीची वसुली न करता गाव एकही दिवस अंधारात ठेवले नाही मात्र अभियंता कुंदे यांनी सक्तीची वसुली करून देखील वाकडी हे गाव पंधरा दिवसापासून अंधारात असल्याने वाकडी ग्रामस्थांनी अभियंता कुंदे व महावितरण विरोधात प्रतिनिधी सोबत बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत .
