जनतेज न्युज

शासकीय सोसायटीच्या जागेवर अतिक्रमण करून कोट्यावधी रुपयांची जागा बळकावणाऱ्यास शिवणी ग्रामस्थानी दिला दम.

प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यातील शिवणी येथिल शासकीय सोसायटीच्या मौल्यवान जागेचा वाद न्याय प्रविष्ठ असताना देखील सोसायटीचे चेअरमन यांनी सोसायटीच्या जागेवर अतिक्रमण करून जागा बळकावण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. किनवट तालुक्यातील शिवनी ते अप्पाराव पेठ मुख्य रस्त्यालगत असलेल्या सोसायटीच्या जागेवर सोसायटीचे गोदाम हे जीर्ण अवस्थेत असुन सोसायटीच्या कारभाराची मरगळ पाहता येथील  सोसायटीचे चेअरमन यांनी आमचीच जागा आहे म्हणून असा दावा केला होता. अशा या मौल्यवान किमतीच्या या जागेचा वाद सध्याला न्यायप्रविष्ट असताना देखील या जागेवर रात्रीला लोखंडी शेड उभे करून ही जागा हडप करण्याचा प्रकार होत असताना गावकऱ्यांनी ही सोसायटीची जागा आहे असे म्हणत हे लोखंडी शेड उखडून फेकून देत लोखंडी शेड उभे करणाऱ्यास चांगलाच दम दिलाय.