पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकर्यांची भाजीपाला यशस्वी शेती…
प्रतिनिधी , जळगाव : शेती म्हणजे तोट्याचा व्यवसाय कितीही मेहनत घेतली तरी काहीच उरत नाही असा परंपरागत शेती करणार्या शेतकर्यांचा अनुभव परंतु एका शेतकर्यांने शेतीला फाटा देत भाजीपाला पिकावर लक्ष केंद्रित केले आहे त्यांनी अर्धा एकर मध्ये नुकतेच बटाटा घेतला होता. त्यात त्यांना खर्च वजा जाता एक लाखांचे उत्पन्न मिळवले होते.बियाणांचा कांदा लागवड करून त्यातुन लाखांचे घेतले.परत कांदा लागवड करून त्यातुनही खर्च वजा जाता लाखांचे उत्पन्न मिळवले.सध्या आता अर्धा एकर मध्ये त्यांनी गोबी चे उत्पादन घेत आहेत.दोन ते अडीच महिन्यांनी येणारे पिक असून त्यांना आता पर्यंत दाहा ते बारा हजार रुपये इतका खर्च करावा लागला असुन त्यांना या पिकापासुन चांगला भाव मिळाल्यास त्यांना खर्च वजा जाता सुमारे 70 ते 80 हजारांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील शिवाजी महादु पाटिल यांच्याकडे सात एकर शेत जमीन आहे.काही तरी वेगळे करण्याची जिद्द असली की यश निश्चितच मिळते.
परंपरागत पध्दतीला फाटा देण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला.पहिल्या वर्षी अर्धा एकरातच भाजीपाला लावला.अर्धा एकरापासुनच सुरु झालेली शेती टप्याटप्याने आज सात एकर वडिलोप्रजित शेत जमीन मध्ये वेगवेगळ्या पिकांचे नियोजन करून लाखोंचे उत्पन्न घेत आहे.त्यात मिरची, वांगी,भेडस,कांदा, बटाटा,अद्रक, आदी पिकांचे उत्पादन घेऊन कमी दिवसात कमीत कमी पाण्यातून कमी खर्चात आज लाखोचे उत्पन्न शिवाजी पाटील घेत आहेत.आज त्यांच्या वडिलोप्रजित सात एकर शेत जमीन मध्ये वेगवेगळ्या पिकांचे नियोजन करून यशस्वी भाजीपाला शेती करित आहे.आजही त्याच्या शेतात वेगवेगळे भाजीपालासह इतर पिके बहरु लागले आहे.सध्या त्यांच्या शेतात वांगे,मिरची,भेडस,गोबी,सह बटाटा,अद्रक,आदी पिके डौलाने उभी आहेत.सर्व प्रथम त्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करूनच पिकांची लागवड केली जाते. तसेच बदलत्या हवामानाचा अभ्यास करुन पिकाची निवड केली जाते असे ते सांगतात.त्यांनी आपल्या शेत जमिनीवर योग्य पाण्याचे नियोजन करून इतर शेतकर्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
कमी क्षेञात लागवडीचा फायदा..
शिवाजी पाटील यांच्या कडे सात एकर शेत जमीन असुन ते त्या शेत जमिनीवर वेगवेगळ्या पिकांचे नियोजन करून शेती करतात.प्रत्येक पिक ते कमीत कमी क्षेत्रातच लागवड करतात.. कारण कमी क्षेत्रात एखादे पिकातुन नुकसान झाले तर ते कमी प्रमाणातच राहते त्यामुळे हा कमी क्षेत्रात लगवडीचा फायदा असतो असे ते सांगतात…
फवारणी चे नियोजन…
गोबी पिकाला आता पर्यंत फक्त दोन वेळाच औषधी फवारणी करण्यात आली आहे.त्यामुळे कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पिक आहे.आता ही अर्धा एकर मध्ये लगवड केलेली गोबी तयार झाली असुन ती लवकरच काढणीस योग्य होईल.
खते देतात ठिबक सिंचनाव्दारे…
पाटील यांच्या कडे सात एकर शेत जमीन आहे ते सर्व सात एकर शेत मध्ये त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे.त्यामुळे ते सर्व लगवड केलेली पिकांना खते हे ठिबक सिंचनाव्दारेच देत असतात.अर्धा एकर मध्ये लगवड केलेली गोबी आता तयार झाली असुन ती लवकरच काढणीस योग्य होईल…त्यांनी या गोबी पिकाला आता पर्यंत फक्त दोन वेळा ठिबक सिंचनाव्दारे खते सोडलेले आहेत…
अर्धा एकर गोबी पिक काढणीवर…
अर्धा एकर मध्ये लगवड केलेली गोबी पिकाची लागवड केली असुन ते पिक आता लवकरच काढणीवर आले आहे. त्यांना आता पर्यंत सुमारे दाहा ते बारा हजार रुपये इतका खर्च करावा लागला असुन त्यांना या गोबी पिकापासुन सुमारे लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
मालाची विक्री थेट बाजारपेठेत….
शिवाजी पाटील हे आपल्या शेतात पिकविलेला शेती माल थेट जळगाव येथील बाजारपेठेत स्वाताह जाऊन विक्री करतात.त्यामुळे त्यांना बाजार भावाचा चांगल्याप्रकारे अनुभव आहे.कोणत्या मालाला किती भाव मिळ्तो याचाही ते नेहमीच अभ्यास करूनच पिकाची निवड करतात…
