प्रतिनिधी , विदर्भा : विदर्भातील कोरडवाहू शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यातच रासायनिक निविष्ठाचे वाढते दर त्यामुळं शेती तोट्यात जात आहे. यावर उपाय म्हणून गोंडेगाव येथील उच्चशिक्षित प्रगती एकाडे या महिला शेतकऱ्यांनी शेतातील टाकाऊ कचरा गोमूत्र, शेळीचे मूत्र यापासून अमृत कवच तयार केले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत असल्याने शेतकऱ्यांची या अमृत कवच लिक्विड ला चांगली मागणी आहे…..
वाशिम तालुक्यातील हे आहेत गोंडेगाव येथिल प्रगती एकाडे यांच पदवीपर्यंत शिक्षण झालं असून,पती सुनिल एकाडे कृषी विभागात नोकरीला आहेत.त्यांना शेतीची आवड असल्याने काही तरी वेगळं करण्याचं ठरवलं आणि शेतातील कचरा ,शेण,गोमूत्र, शेळीचे मूत्र अस एकत्र करून अमृत कवच बनवून शेतकऱ्यांना माफक दरात देत आहेत.
ग्रामीण भागात मजुरी करणाऱ्या महिलांकडून शेळीचे मूत्र दहा रुपये लिटर आणि गाईचे गोमुत्र दहा रुपये लिटर खरेदी करून त्यापासून अमृत कवच तयार करतात त्यामुळं शेळी पालन करणाऱ्या महिलांना मल मूत्रापासून पैसे मिळत आहेत तर अमृत कवच शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
व्हीओ:- सुरुवातीला छोटेखानी असणारा हा उधोग आता मोठ्या प्रमाणात वाढला असून,मागणी नुसार त्यांच्या कडे 25 हजार लिटर अमृत कवच तयार आहे.शेतकऱ्यांना 300 रुपये प्रतिलिटर देत आहेत.
दिवसेंदिवस वाढत असलेले रासायनिक निविष्ठाचे दर आणि शेतमालाला मिळणारा भाव यामध्ये मोठी तफावत असल्याने शेती तोट्यात जाऊन शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. मात्र उच्चशिक्षित प्रगती एकाडे यांनी केलेले अमृत कवच शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी रासायनिक शेती न करता शेंद्रिय शेती केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन शेती फायद्याची व्हायला वेळ लागणार नाही यात मात्र शंका नाही…..
