प्रतिनिधी , मुंबई : आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या आधी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात पेट्रोल आणि डिझेल च्या वाढत्या दरामुळे सामान्य नागरिक अगदी त्रासलेले आहेत. या पार्श्भूमीवर आज काँग्रेस पक्षाने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंदोलन केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्य्षतेखाली आज विधानभवनात येताना यांनी सायकल रॅली काढली होती..
