प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडून ओला आणि सुखा कचरा वेगळा करण्याचे आदेश सोसायट्यांना देण्यात आले आहेत. परंतु कल्याण-डोंबिवली परिसरात रस्त्यावर व मुख्य ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य असल्याने आणि आणि समाज सेवक त्रस्त
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. या अंतर्गत कचरा विलगिकरण त्यावर विविध प्रक्रिया करून त्यासाठी प्रोजेक्टही महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहेत. यासाठी महापालिकेकडून ओला आणि सुख कचरा विलगिकरण करण्याचे आदेश कल्याण डोंबिवली मधील सोसायट्यांना आणि रहिवाश्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर शहरात कचरा दिसू नये यासाठी रस्त्यावरच्या सर्व कचराकुंड्या ही उचलण्यात आल्या व रस्त्यावरती कचरा टाकल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात दंड ही आकारण्यात येत आहे मात्र आता पालिकेचे घनकचरा विभागातील कचरा सफाई कर्मचारी रस्त्यावर सकाळी जो कचरा काढला जातो तो तसाच रस्त्याच्या कडेला लावला जातो. तो उचलला जात नाही काही दिवसांनंतर ढिगारा वाढू लागल्यावर त्याला जाळलं जात. त्यामुळे पर्यावरणाला हाती होत असून परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे आणि त्यामुळे रहिवासी व नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले. वारंवार तक्रारी करून फक्त तेवढ्यापुरती समस्या सोडवली जाते पण यावर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार असा सवाल देखील महिलांनी उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर महानगरपालिके साठी महापालिका दूत म्हणून काम करणाऱ्या सामाजिक संघटनाही पालिका प्रशासन दुर्लक्ष असल्यामुळे पालिका आयुक्त व संबंधित घनकचरा अधिकारी विरोधात नाराजगी व्यक्त केली आहे
तर सर्व रस्ते झाडले जातील हा आमचा उद्देश असून आमच्याकडे काही तक्रारी आल्या तर आम्ही स्वतः जाऊन खात्री करू आणि कर्मचाऱ्यांना त्याबाबत समज देण्याचे आश्वासन पालिका उपयुक्त रामदास कोकरे यांनी दिले आहे.
