प्रतिनिधी , धुळे : संपूर्ण राज्यात इंधन दरवाढीविरोधात विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने धुळे शहरात चूल आणि गौऱ्यांचे वितरत करत अनोखे आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण देशात एकीकडे महागाईचा भडका उडालेला असताना दुसरीकडे या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यावर केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही मोठ्या प्रमाणावर वाढ केल्यानंतर, विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने गॅस दरवाढीविरोधात मातीच्या चुली आणि शेणाच्या गौऱ्याचे वीतरत करत अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.
