जनतेज न्युज

अमरावती मध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोविंड लसीकरणाला सुरुवात

प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात आज पासून दुसऱ्या टप्प्यातील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना ही लस दिल्यानंतर आजपासून अमरावती शहरात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना ची लस मोफत उपलब्ध झाली आहे. याचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांनी केले, त्यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले या योजने अंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील आठ खाजगी रुग्णालयात सुद्धा उद्यापासून ही लस उपलब्ध होणार आहे.यासाठी दोनशे पन्नास रुपये शुल्क सुद्धा आकारण्यात आला आहे. मात्र शासकीय रुग्णालयातील अस मोफत दिली जाणार आहे