प्रतिनिधी , मुंबई : पोलिसांची कामगिरी दाखवणारी नवी लक्ष ही मालिका 7 मार्चपासून स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. याच धर्तीवर स्टार प्रवाहकडून वाळू शिल्प काढत महाराष्ट्र पोलिसांना सलाम करण्यात आलाय.
महाराष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी मुंबई पोलीस तसेच महाराष्ट्र पोलीस अतिशय चोख पद्धतीने नेहमीच बजावत असतात. म्हणूनच त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी व त्यांचे शौर्य संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरात समोर येण्यासाठी स्टार प्रवाह नवीन मालिका घेऊन येत आहे. या मालिकेचे नाव आहे नवे लक्ष्य ही मालिका 7 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेच्या प्रमोशनसाठी टीमने अतिशय सुबक असे वाळू शिल्प काढून महाराष्ट्र पोलीस तसेच मुंबई पोलिसांना एक अनोखा सलाम दिला आहे.जुहू चौपाटी जवळ झालेला एका कार्यक्रमात हे वाळूचे शिल्प साकारले गेले.या कार्यक्रमासाठी पोलीस संदीप कर्णिक सोबत पोलीस दलातील अन्य सहकारी,
तसेच नवे लक्ष्य मालिकेतील सर्व कलाकार उपस्थित होते.
