जनतेज न्युज

अवैधरित्या बाळगल्या जाणाऱ्या 9 तलवारी जप्त, दोन जणांना अटक

प्रतिनिधी, जालना : जालन्यात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून शोधमोहिम सुरू आहे.या मोहिमेदरम्यान सदर बाजार पोलिसांनी 9 तलवारी जप्त करत दोघांना अटक केलीय. तलवारी बाळगणाऱ्यासह तलवारी खरेदीसाठी मध्यस्थी करणाऱ्याला देखील पोलिसांनी अटक केलीय. शेख कलीम शेख रफिक आणि आफरोज हफिज पठाण अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.शहरातील वाल्मीकनगर भागात ही कारवाई करण्यात आली.दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी सदर बाजार पोलीस अधिक तपास करतायत.