प्रतिनिधी, बीड : बीड शहरात तासभर झालेल्या पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिलीय. शहरातील शाहू नगर, जालना रोड, केसके महाविद्यालय, शासकीय कार्यालय परिसरासह सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर एसटी बस स्थानकाला तळ्याचं रूप आले आहे. बीड शहरात सायंकाळच्या सुमारास तासभर पावसाने दमदार बॅटिंग केलीय. अचानक झालेल्या पावसाने तारांबळ उडाली होती. दरम्यान एस्टी स्थानकात जास्त पाणी साचल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
