प्रतिनिधी, सांगली : महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या साठी काही करत नाही म्हणून, आम्ही आघाडी मधून बाहेर पडलो. मात्र आता जो सत्तासंघर्ष चालू आहे, तो विकासाच्या प्रश्ना साठी नाही. आताच सत्तांतरासाठी जी पद्धत वापरली जात आहे, तिला आमचा आक्षेप आहे. सत्तेचा ताम्रपट कोणच घेऊन येत नसतो त्यामुळे, उद्या तुमच्यावर पण अशी वेळ येऊ शकते, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. सांगली मध्ये शेट्टी हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान योजनेतून वगळण्यात आले. त्यामुळे सरकारने, शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तसेच 95 टक्के ऊस उत्पादक शेतकरी या योजने पासून वंचित राहणार आहेत. शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसणार आहे. शेतकऱ्यावर अन्याय आहे. आताच सरकार जाणार हे गृहीत धरून अधिकाऱ्यांनी मनाला येईल असे प्रोत्साहनपर अनुदान योजनेचे नियम केले आहेत.या आठवड्याच्या आत प्रोत्साहनपर अनुदान योजनेचे नियम बदलले नाहीत, स्वाभिमानी शेतकरी संघटना मोर्चा काढणार आहे. असा इशारा ही राजू शेट्टी यांनी दिला. पुढील हंगामात, एक रकमी एफ आर पी दिल्या शिवाय ऊस तोडू दिला जाणार नाही, असा इशारा ही माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. महाविकास आघाडी पडली तरी दु;ख नाही,आली तरी आनंद नाही.
