जनतेज न्युज

जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला दिशा देण्यासाठी नवसंकल्प शिबिर घेणार

प्रतिनिधी, यवतमाळ : राज्य स्तरावर काम करण्यासाठी काँग्रेस पक्षाने रणनीती ठरवली आहे. राज्यातील प्रश्न कोणते आहेत, त्याची चर्चा शिर्डी येथील सभेत करण्यात आली. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला दिशा देण्यासाठी 27 जून रोजी मोहदा येथे नवसंकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांनी केले आहे.