प्रतिनिधी, अहमदनगर : संविधान बचाव समिती श्रीरामपुर यांच्याकडुन गुजरात राज्यामध्ये झालेल्या हिंसाचारात ” बिलकिस बानो ” या गरोदर महिलेवर बलात्कर करण्यात आला तसेच त्यावेळी तिच्या सोबत असलेली तिची मुलगी वय ३ वर्षे हिच्या सह त्या महीलेच्या कुटूंबातील ७ व्यक्तींना जिवे ठार मारण्यात आले आहे . सदरचा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होवुन मा . न्यायालयाने गुन्हेगारांना आजीवन कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर सदर आरोपींना मा . सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती त्या ठिकाणी सुध्दा सुनावणी झालेली आहे . त्या ठिकाणी मा . उच्च न्यायालयाने आरोपीची शिक्षा कायम केली आहे . परंतु एवढी सगळी नैसर्गीक न्यायाची प्रक्रीया होवुन शिक्षा झालेल्या गुन्हे गारांना गुजरात सरकारने १५ ऑगस्ट २०२२ रोजी या गुन्हे गाराची शिक्षा माफ करुन त्यांना मोकट सोडुन दिले आहे .याचा निषेध करत हा मोर्चा काढन्यात आला.एकीकडे आपण स्त्री सन्मानाचे गोडवे गात असताना दुसरीकडे एखाद्या महिलेवर सामुहीक पणे अत्याचार करण्याच्या गुन्हे गारांना सोडुन देणे हे एक न कळणारे कोडे आहे अशा गुन्हेगारांना सोडुन देणे म्हणजे समाजात असल्या वाईट प्रवृत्तीस प्रोत्साहन देण्या सारखे आहे . म्हणुन आम्ही यांचा तिव्र शब्दात निषेध करतो . त्याच प्रमाणे राजस्थान या राज्या मध्ये इंद्र मेघवाल नावाचा दलीत विद्यार्थी माठातुन पाणी घेण्यासाठी गेला असता फक्त माठाला हात लावला म्हणुन शिक्षकाने इतकी भयानक मारहान केली त्या मारहाणी मध्ये त्या आठ वर्षे वय असलेल्या विद्यार्थाचा मृत्यु झाला त्या घटनेचाही आम्ही सर्व तिव्र निषेध करतो असे सांगन्यात आले.
