प्रतिनिधी , पुणे : कोविड १९ दरम्यानची परिस्थिती फारच बिकट असल्यामुळे वाढीव दराने जास्तीचे वीज देयके देण्यात आलीत , ती रद्द करून २०० युनिट वीजबिल माफ करावे आणि ७ व ८ सप्टेंबर २०२० होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टी यांनी केली आहे .
कोविड दरम्यानच्या मार्च ते जून या चार महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफ करावी , १ एप्रिल २०२० पासून करण्यात आलेली वीज दरवाढ मागे घ्यावी , जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे ३०० युनिट पर्यंत ३० टक्के स्वस्त वीज देण्यात यावी , राज्य सरकारचा १६ टक्के अधिभार आणि वहन कर रद्द करण्यात यावा , वीज कंपन्यांचे कॅग ऑडिट करण्यात यावे . कोविड दरम्यानचे भरमसाठ दिलेले वीज बिल मागे घेऊन मागील वर्षाच्या याच कालावधीत जे वीज देयके आले होते त्या प्रमाणे महिनेवारीचे सुधारित जुन्याच दराप्रमाणे वीज देयक देण्याचे आदेश द्यावेत . अन्यथा राज्यातील सर्व वीज कार्यालयांना १० सप्टेंबर २०२० ला कुलूप लावण्याचे आंदोलन करण्यात येईल .
