जनतेज न्युज

आज गणेश जयंती त्यानिमित्ताने गणरायाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

प्रतिनिधी , मुंबई : आज गणेश जयंती त्यानिमित्ताने गणरायाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटे पासूनच भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. संगीत, यज्ञ, महाआरती आणि विविध कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. पुण्यातील दगडूशेठ मंदिरात दुपारी १२ वाजता गणेश जन्म सोहळा पार पडणार असून मंदिर परिसरात फुलांची विशेष आरास करण्यात आली आहे. तसेच मुंबईत सिद्धिविनायकाच्या मंदिरातही गणेश जन्म सोहळ्यासाठी पाळणा तयार करण्यात आला असून मंदिर परिसरात मोठा उत्साह बघायला मिळत आहे. सिद्धिविनायकाच्या मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्याकरिता अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या संपूर्ण परिवार सोबत सिद्धिविनायक मंदिर येथे दर्शनासाठी आली होती. तर गायिका अनुराधा पौडवाल यांनी देखील माजी गणेशोत्सव निमित्ताने गणपतीचे दर्शन घेण्याकरिता सिद्धिविनायक मंदिरात आल्या होत्या.