प्रतिनिधी , मुंबई : गेल्या १८ दिवसापासून विनाअनुदानित शिक्षक आजाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. राज्य सरकारकडून कुठलीही दखल घेत नसल्यामुळे आज आझाद मैदान आंदोलनस्थळी जाण्यापूर्वी अनोख्या पद्धतीने गांधीगिरी मार्गाने पायी चालत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यापासून हुतात्मा चौकापर्यंत सर्व शिक्षकांनी आंदोलन केले. तर राज्य सरकारला जाग घेण्याकरिता हा एक आंदोलनाचा भाग असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले.
