जनतेज न्युज

आठवडाभर उसंत घेतलेल्या पाऊसाची पुन्हा हजेरी : अग्रणी नदी दुथडीभरून वाहू लागली

प्रतिनिधी, सांगली : मागील आठवडाभर पावसाने उसंत घेतल्यानंतर जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. शिराळा, वाळवा, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तासगाव, खानापूर, जत तालुक्यातील काही गावात रिमझिम पावसाच्या सरी बसरल्या. संततधार पडणाऱ्या पाऊसामुळे अग्रणी नदी दुथडी भरून वाहत आहे. काही ठिकाणी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  हवामान विभागाने पुढील चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे. जुलैच्या पंधरवड्यात दमदार पाऊस बसरल्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर कमी झाला होता. दमदार पावसानंतर पेरण्यांना गती आली. पावसाने उसंत घेतल्यानंतर जिल्ह्यात काल सायंकाळनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. दिवसभर ढगाळ वातावरण होते, सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. शिराळा, वाळवा, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तासगाव, खानापूर, जत तालुक्यातील काही गावात रिमझिम पावसाच्या सरी बसरल्या. सांगली शहरातही सायंकाळी संततधार पाऊस झाला