जनतेज न्युज

आधारवाडी डम्पिंगवर कारवाईच्या रागातून आग लावल्याचा संशय पालिका प्रशासनाकडून संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रतिनिधी, कल्याण : कल्याण आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर मागील आठवड्यात लागलेली आग हि आकसातूनच सूडबुद्धीने कारवाईच्या रागातून लावण्यात आल्याचा आरोप करत याप्रकरणी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुलाब जगताप यांच्या विरोधात तक्रार केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कल्याणच्या आधारवाडी डम्पिंगवर जाणारा ओला कचरा बंद करण्यात आला असला तरी सुका कचरा डम्पिगवर नेला जात आहे. हा सुका कचरा वर्गीकरण करण्याचे काम घेतलेल्या रेखा लाखे यांनी पालिकेची कोणतीही परवानगी न घेताच डम्पिंगवर शेड उभारण्याचे काम सुरु केले होते. मात्र याची माहिती मिळताच पालिका प्रशासनाकडून या शेडवर कारवाई करत ती तोडण्यात आली. यानंतर दोनच दिवसात या डम्पिंगवरील कचर्याला मोठी आग लागली असून या आगीवर नियत्रण मिळविण्यासाठी पालिका प्रशासनाला दोन दिवस लागले. दरम्यान आग विझवल्यानंतर पालिका उपायुक्त कोकरे यांनी डम्पिंगवर आग लागू नये याकरिता डम्पिंगवर पाणी मारण्याचे काम. राहुल मजूर कामगार सहकारी संस्था मर्यादित या संस्थेला
दिले असून या संस्थेमार्फत गुलाब जगताप पाणी मारण्याचे काम करतात. रेखा लाखे हि गुलाब जगताप यांची बहिण असून बहिणीची डम्पिंगवरील अनधिकृत शेड तोडल्याचा राग आल्यानेच जगताप यांनी आकसातून डम्पिंगवरील कचर्याला आग लावल्याचा आरोप करत याप्रकरणाची सखोल चौकशी करत संबधितावर कारवाई करण्याची मागणी केडीएमसी उपायुक्त विजय कोकरे यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी गुलाब जगताप विरोधात पोलिसात रीतसर तक्रार केली आहे. तर याबाबत गुलाब जगताप यांनी पालिकेचे पत्र योग्य असून ही आग कोण लावतो याचा पोलीस पोलिसांनी करावा असे सांगत आपली बाजू मांडली