जनतेज न्युज

धाकल तुळजापुर म्हणुन प्रसिद्ध येरमाळ्याच्या येडेश्वरी चैत्र यात्रा होणार पण ५० टक्केचे निर्बंध कायम – आहील्या गाठाळ

प्रतिनिधी, उस्मानाबाद :

धाकले तुळजापुर म्हणुन प्रसिद्ध असलेल्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रा दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी होणार असुन प्रशासनाने शुक्रवार दिनांक 25 मार्च रोजी आढावा बैठक घेत कोरोनाच्या निर्बंधांचे पालन करुन पन्नास टक्के क्षमतेने यात्रेचे नियोजन करण्यात येईल असे उपविभागिय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी स्पष्ट केले.
बैठकीला विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, देवस्थानचे पुजारी, देवीचे मानकरी, ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ या वेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमेला होणारी मोठी यात्रा गेल्या दोन वर्षांपासून रद्द केली होती. मात्र कोरोनाचे निर्बंध कांहीअंशी कमी झाल्याने यात्रेबाबत प्रशासनाने शुक्रवारी(ता.२५) नियोजन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीच्या अध्यक्ष उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी यावेळी या वर्षी यात्रा होणार असून कोरोना संसर्ग क्षमता पाहता राज्यातील सोळा जिल्हे निर्बंध मुक्त झाले असले तरी आपला जिल्हा निर्बंधात असुन कोरोनाचे मास्क,सॅनिटाझर,आणि सुरक्षित अंतराच्या निर्बंधात पन्नास टक्के क्षमतेत भरविली जाईल असे सांगितले.
यात्रा काळात गर्दीने होणारे विधी सुरक्षित अंतर ठेवून पन्नास टक्के क्षमतेने करावे असे सूचित करुन या वर्षीच्या येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा होणार यावर शिक्कामोर्तब केले.येडेश्वरी देवीची यात्रा भरणार असल्याचे प्रशासनाच्या नियोजन बैठकीवरुन निश्चित झाले असल्याने भाविक,पुजारी,व्यासाईक,ग्रामस्थामध्ये चैतन्याचे वातवरण निर्माण झाले आहे.
या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी एम.रमेश, तहसीलदार मुस्तफा खोंदे, सपोनि दिनकर गोरे,देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब बेदरे, देवीचे मानकरी यशवंत पाटील, अमोल पाटील, वैद्यकीय अधिकारी सुधाकर बिराजदार, महावितरण च्या सहाय्यक अभियंता आर.ए.शितोळे, वाहतूक नियंत्रक रामलिंग शिंदे, सरपंच तबसुम सय्यद,माजी सरपंच विकास बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब बेदरे उपस्थित होते.
या बैठकीला गावतील ग्रामस्थ,पुजारी,मानकरी,राजकीय पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कोरोनाच्या निर्बंधात होणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने,भाविकांच्या सुखसोई,सुरक्षितता,वाहतूक व्यवस्थेवर तसेच विविध प्रशासकीय विभाकडून यात्रा काळात केल्या जाणाऱ्या विविध उपाय योजनेवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली,तसेच यात्रेच्या काळात केल्या जाणाऱ्या उपाययोजने बाबत उपस्थित ग्रामस्थ,राजकीय पदाधिकारी यांनी यावेळी आपल्या सूचना मांडल्या.
ही यात्रा प्रशासकीय नियोजन बैठक येथील विठ्ठलरुक्मिणी मंदिरात शांततेत पार पडली.
या बैठकीचे सूत्रसंचालन समाधान बेदरे यांनी केले.यावेळी येत्या १७ एप्रिल ते २१एप्रिल पर्यंत होणाऱ्या श्री येडेश्वरी चैत्र पोर्णिमा यात्रा निगडित सर्व प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडून यात्रा शांततेत व नियोजबद्ध पार पाडावी. तसेच यासाठी गावातील तरुण स्वयसवकांनी सहकार्य करावे असे विभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी सांगितले तर येडेश्र्वरी देवीची चैत्र यात्रा होत असताना येरमाळ्या मध्ये येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता दूरवर पार्किंग व्यवस्था करून ट्रॅफिकचा गोंधळ होणार नाही अशा प्रकारे नियोजन केले जाईल. तर महामार्गावर सीसी टीव्ही बसवण्यासाठी प्रयत्न करू जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच अग्निशामक बंब देखील येरमाळ्या मध्ये मुक्कामी ठेवण्यात येतील असे उपविभागीय पोलीस अधिकारी एम रमेश यांनी सांगीतले