जनतेज न्युज

आपण मागे वळून पाहिले पाहिजे आपण होतो कोण ? आणि झालो कोण? अर्जुन खोतकर यांचा बंडखोर आमदारांना मिश्किल टोला

प्रतिनिधी, जालना : आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ज्या विश्वासाने शिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली ही जबाबदारी आम्ही अत्यंत निष्ठापूर्वक ही जबाबदारी पार पडण्याचा प्रयन्त करू अशा विश्वास माजी मंत्री शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलाय. या वेळी अर्जुन खोतकर यांनी खरंतर आपण मागे वळून पाहिले पाहिजे आपण होतो कोण.? आणि झालो कोण? हे स्वतःच्या मनाला निश्चित पणे प्रश्न पडला पाहिजे.मी तरी पुढे जात असताना सातत्याने मागे वळून पाहतो.आपण होती कोण आणि झालो कोण. असा मिश्किल टोला ही त्यांनी यावेळी कुणाचे ही नाव न घेता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना लगावत या चार शब्दातच आपल्या पाठीमागे सर्व गोष्टी आल्या.जे काही आमच्या आयुष्यात आहे ते सर्व शिवसेनेने दिलंय, त्यामुळे आम्ही अहोरात्र कामकरणारी माणसं आहोत.चाळीस वर्षाचा जो वसा आहे तोच वसा आम्ही पुढे चालवणार असल्याचं देखील अर्जुन खोतकर यांनी यावेळी माध्यमाशी बोलताना म्हंटल आहे.