प्रतिनिधी, जळगाव : अमरावती मधील उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी इरफान खान याचे तिथल्या अपक्ष खासदार सोबत काय राजकीय संबंध आहे?? याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आदिल बोपराई यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेत नवनीत राणा यांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले.उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात इरफान खान हाच मास्टर माईंड असून त्याचे अपक्ष खासदार आणि त्यांच्या पतीसोबत राजकीय संबंध असल्याचा आरोप आदिल बोपराई यांनी केला आहे. उदयपूर मधील कन्हैया कुमार यांची हत्या प्रकरण असो किंवा अमरावती मधील उमेश कोल्हे यांचे हत्या प्रकरण मुख्य आरोपींचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या भाजप किंवा त्यांच्या मित्र पक्षांशी संबंध का समोर येत आहे याचा खुलासा होण्याची गरज असल्याचे बोपराई म्हणाले.
