जनतेज न्युज

आमदार संजय राठोड यांच्या कार्यालयासह घराची सुरक्षा वाढवली

प्रतिनिधी, यवतमाळ : शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. आमदार शिंदे गटात सामील झाले. मात्र, शिवसैनिक अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. त्यातूनच बंडखोर आमदार, मंत्री यांच्या कार्यालयाला टार्गेट करून तोडफोड करण्यात येत आहे. याच पाश्वभूमीवर यवतमाळ येथील आमदार संजय राठोड यांच्या कार्यालयासह घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वरीष्ठ पोलिस अधिकारी सर्व घडामोडीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. आईचे दूध विकणाऱ्या गद्दारराना माफ करणार नाही, त्यांना धडा शिकवला जाईल,असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.