जनतेज न्युज

खा. श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिवलीतील बंगला बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात.

प्रतिनिधी, कल्याण : शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्य बंडाळीनंतर राज्यात शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पहायला मिळत आहे. शिंदे समर्थकांनी ठिकाणी बॅनरबाजी करून त्यांना समर्थन दिलं होतं त्यानंतर आता शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर तोडफोड करण्यात आली आहे .उल्हासनगर मध्ये देखील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी तोडफोड केली. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत देखील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . खासदार श्रीकांत शिंदे यांचे डोंबिवली मधील बंगला आहे, या बंगला मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत.तर डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेरबाहेरही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उल्हासनगर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तिथे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय . त्याच प्रमाणे कल्याण डोंबिवली या दोन्ही शहर शाखा बाहेर देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.