प्रतिनिधी, बुलडाणा : गोंदिया भंडारा जिल्ह्यातील कान्हाळमोह व गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे महिलेवर अमानुष अत्याचार झाले आरोपी नराधमांनी तिला गंभीर जखमा करून रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. सध्या ही पिडीता नागपूर येथे मृत्यूशी झुंज देत आहे. माणुसकीला काळे फासणारी ही घटना दिल्लीतील “निर्भया” प्रकरणापेक्षाही गंभीर आहे. ह्या घटनेतील पिडीतेला त्वरित न्याय मिळावा यासाठी आरोपींवरील खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा. तसेच ह्या घटनेतील नराधमांना कठोरातील कठोर म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष जयश्री बोरकर यांनी भंडारा येथे पत्रकर परिषदेत केली. सदर पीडित महिलेला अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी ‘मनोधैर्य योजनेचा लाभ मिळावा. महिला सुरक्षा हा विषय अधिक गंभीरपणे घेण्यासाठी, दोन्ही जिल्ह्यात “दामिनी” पथकाची निर्मिती सारखे आपले उपक्रम सक्षमपणे राबवून महिला पोलिसांची गस्त वाढवावी. जेणेकरून कोणीही असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. असे परखड सौ जयश्री बोरकर अध्यक्ष भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी यांनी मांडले .
