जनतेज न्युज

सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला

प्रतिनिधी, चंद्रपुर : भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर चंद्रपुरातील त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. ढोल ताशांच्या तालावर थिरकत मुनगंटीवार आज बढोच्या घोषणा देण्यात आल्या. महिला पदाधिकारीही यात सहभागी झाल्या. भर पावसात हा जल्लोष करण्यात आला. मुनगंटीवार यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली असून, 1995 मध्ये युतीच्या पहिल्या सरकारात पर्यटन, तर 2014 मध्ये अर्थ आणि वन खात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. आता तिसऱ्यांदा ते मंत्रीपदी विराजमान झाल्याने जिल्ह्याचा विकास वेगाने पुढे जाईल, अशी अपेक्षा माजी महापौर राखी कांचरलावार यांनी व्यक्त केली