प्रतिनिधी, कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत देखील आपचा झेंडा फडकणार ; आम आदमी पार्टीचा दावा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये एकहाती सत्ता प्रस्थापित केल्यानंतर आपचा उत्साह वाढला असून आज सत्ता स्थापन झाल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात मिठाई वाटून आनंद साजरा केला. दिल्लीनंतर पंजाब मधील जनतेने आपवर विश्वास दाखवला असून कल्याण डोंबिवली महापालिकेत देखील आपचा झेंडा दिमाखात फडकणार असल्याचा विश्वास यावेळी आपचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यानी व्यक्त केला. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आम आदमी पार्टी छोट्या मोठ्या आंदोलनाच्या माध्यमातून आपले अस्तित्व टिकवून आहे मात्र आता पंजाब मध्ये आम आदमी पार्टीची सत्ता आल्याने आपच्या कार्यकर्त्याचा हुरूप वाढला आहे .
