जनतेज न्युज

आयकॉन क्रिटिकल हॉस्पिटलचे रोहिनी खडसे यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी , जळगाव : सध्या भुसावळ शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे परंतु ज्या रुग्णांना करणार नाही अशा रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटल सध्या उपलब्ध नाहीत याची दखल घेत भुसावळ येथील डॉक्टर सुरज भोळे यांनी आयकॉन क्रिटिकल हॉस्पिटलचे स्थापना केली आहे या आयकॉन क्रिटिकल केअर आणि मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करताना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर ,आ संजयजी सावकारे, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे या हॉस्पिटलमध्ये माफक दरात नॉन कोवीड रुग्णांना उपचार देण्यात येणार आहे या हॉस्पिटलमध्ये सर्व अत्याधुनिक उपचार प्रणाली वापरण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर सुरज भोळे यांनी दिली आहे माजी नगराध्यक्ष विजय भाऊ चौधरी, डॉ सुरज भोळे, डॉ अमोल रावते, डॉ निलेश क्षिरसागर, डॉ किरण पाटील, प्रा प्रशांत पाटील, गणेश कोळी आणि मान्यवर उपस्थित होते