प्रतिनिधी , जळगाव : भुसावळ शहरालगत असणाऱ्या शासकीय ट्रामा केअर सेंटरला शहरातील दानशूरांनी एकत्र येईल अडीच लाखाची औषधे आज भेट देण्यात आली आहे कोरोना बाधित रुग्णांना शासनाकडून वेळेत औषधे उपलब्ध होत नाहीत म्हणून हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी मयुर चौधरी यांनी भुसावळचे नगरसेवक पिंटू कोठारी यांच्याकडे औषधांची लिस्ट दिली होती त्यामुळे पिंटू कोठारी यांनी दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून अडीच लाख रुपयांची औषधे आज ट्रामा केअर सेंटरला भेट दिले आहेत या औषधामुळे कोरोना बाधित रुग्णांचे प्राण वाचणार आहेत यापूर्वीही पिंटू कोठारी यांनी दोन लाखाची औषधे ट्रामा केअर सेंटरला स्वखर्चातून भेट दिली होती
