जनतेज न्युज

आरोग्याच्या अनुषंगाने शहरात मान्सूनपूर्व तयारी पूर्ण – मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा

प्रथिनिधी, औरंगाबाद : मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आरोग्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिका हद्दीमध्ये सर्व आरोग्य विभागांना सज्ज करण्यात आले आहे.यासंदर्भात मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी आढावा बैठक घेतली असून औरंगाबाद शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई करण्यात आली असून काही ठिकाणी अजूनही कामे सुरू आहेत.शहरातील अनेक वार्ड मध्ये आरोग्य विभागाला सज्ज ठेवण्यात आले असून, मान्सून पूर्व तयारी जोरात करण्यात आली आहे.आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोणतेही आजाराला समोर जाण्‍यासाठी महानगरपालिकेची आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.यासंदर्भातला आढावा घेण्यात आला असून महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये औषधाचा साठा करण्यात आला असून कोणत्याही आजाराला समोरे जाण्यासाठी मनपाचे आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती त्यांनी आज रोजी दिली आहे.त्याचबरोबर मनपा आयुक्त यांनी शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई रुंदीकरण या संदर्भातील आढावा घेतला असून यासाठी मनपा विभागातील सर्व अधिकाऱ्यांना जोरदारपणे कामाला लावले असून त्या अनुषंगाने मान्सूनपूर्व तयारी मनपाची पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी आज रोजी माध्यमांशी बोलताना दिली आहे.