प्रथिनिधी, औरंगाबाद : आज गुरुवार दोन जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघाच्या वार्ड रचना संदर्भातील प्रारूप आखाडा जाईल करण्यात आला आहे, जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकेक गट नवीन निर्माण झाला असेल तर सिल्लोड तालुक्यात दोन गटाची निर्मिती झाल्याची माहिती देण्यात आली आहे, सोयगाव आणि खुलताबाद या दोन मतदारसंघांमध्ये कोणत्याच प्रकारच्या नवीन गटाची निर्मिती झाली नसल्याची ही माहिती या वेळी देण्यात आली आहे.आज पासून तर 8 जून पर्यंत प्रारुप आराखडा संदर्भात व नवीन रचने संदर्भात नागरिकांच्या हरकती असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागात 8 जून पर्यंत आपल्या हरकती नोंद कराव्या असे आवाहन अप्पर जिल्हा अधिकारी अनंत गव्हाणे यांनी माध्यमांशी बोलताना आज रोजी दिले आहे.आलेल्या हरकतींवरती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे निर्णय घेणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली असून, यानंतर सदरील आराखडा हा निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती आज रोजी देण्यात आली आहे सदरील पत्रकार परिषद जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे संपन्न झाली आहे.राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड येथील मतदारसंघांमध्ये दोन नवीन गटाची निर्मिती झाल्याने राजकारण चांगलेच गरम होण्याच्या मार्गावर दिसत असून, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील मतदार संघामध्ये दोन नवीन गटाची निर्मिती करून घेतली असून आता या संदर्भात मोठ्या प्रमाणात हरकती सिल्लोड तालुक्यातील पाहण्यास मिळतील मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जिल्ह्यात जोरदार तयारी वाहण्याला मिळणार असून प्रारुप आराखडा तयार झाला असून आता लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वारे जोरात वाहण्याला सुरुवात होईल.
