कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर दिव्यांगाचे ठिय्या आंदोलन
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : ज्या व्यक्तींना आर्थिक मदतीची गरज नाही अशा दिव्यांग बांधवांना पालिकेकडून देण्यात आलेल्या निधीची चौकशी करण्याची मागणी इतर दिव्यांग बांधवांनी करत आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर केली .
अपंगांना देण्यात आलेले स्टॉल 2016 पासून बंद आहेत. त्यामुळे आर्थिक मदत मिळावी म्हणून गेल्या 3 वर्षांपासून आम्ही केडीएमसीच्या संबंधित विभागाकडे अर्ज करत आहोत. मात्र आद्यपोर्यंत त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आंदोलनकर्त्या या दिव्यांग बांधवांनी दिली. मात्र ज्या लोकांना आर्थिक मदतची गरज नाही अशा लोकांनाही 5 ते 2 लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप या दिव्यांग बांधवांनी केला आहे.।तसेच शासनाची आर्थिक मदत मिळालेल्यांमध्ये काही नोकरदार व्यक्ती आणि 2 शासकीय अधिकारी असल्याचे पुरावेही आमच्याकडे असल्याचा दावा या दिव्यांग बांधवांनी केला आहे. त्यामूळे शासनाने या आर्थिक मदतीची चौकशी करून गरजू दिव्यांगना आर्थिक मदत देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
