जनतेज न्युज

आवंढी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 23 जनावरांचा मृत्यू : पिसाळलेल्या कुत्र्याची सांगलीत दहशत

प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील आवंढी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर शेतक-यांचे  लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी परिसरात धुमाकूळ घातला आहे.अनेक जनावरांना चावा घेतला आहे. याबाबत पशूवैधकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी कळवूनही वेळेत रेबिजची लस दिली नसल्याने या जनावरांचा मुत्यू झाला असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
आवंढीत गेल्या आठवड्यात काही पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकुळ घातला होता. या कुञ्यांनी गावातील एक बैल, पाच गायी, त्यांची चार लहान पिले, आणि म्हैसींचा चावा घेतला. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी आवंढी पशूवैद्यकीय डॉक्टराना याबाबत  माहिती दिली. मात्र वेळेत उपचार झाले नाहीत. आणखीनही जनावरांना  पिसाळलेल्या कुञ्यांनी चावा घेतला आहे. त्यांनाही रॅबिज झाल्याचा संशय आहे. त्यांना वेळेत लस,उपचार न मिळाल्यास तीही दगावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान शासनाने लाखो रूपये खर्चुन आवंढी येथे श्रेणी १ दर्जाच्या दवाखान्याची प्रशस्त इमारत बांधली आहे. मात्र या दवाखान्याला कायमस्वरूपी  डॉक्टर मिळालेला नाही. कित्येक वर्षापासून प्रभारी अधिकाऱ्यांकडे कारभार देण्यात आला आहे.परिणामी वेळेत उपचार होत नसल्याने  डोळ्यादेखत मुत्यू होताना पाहावे लागत आहे. या  प्रकाराची चौकशी करून संबधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे