जनतेज न्युज

.धुळ्यात मोबाईल टॉवरवर चढून सुरेश तोलानी या नागरिकाचे आंदोलन.

प्रतिनिधी , धुळे : धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या एका मोबाईल टॉवरवर चढत सुरेश तोलानी या नागरिकाने आंदोलन सुरू केले आहे. शहरातील साक्री रोड या भागातील प्रभाग 7 च्या भाजप नगरसेविका कशिष उदासी यांचे पती व माजी नगरसेवक गुलशन उदासी यांचे विरोधात पोलीस कारवाई का करत नाही. गुलशन उदासी यांच्याकडून आपल्याला मारहाण करण्यात आलेली आहे. वारंवार तक्रार करूनही आपला गुन्हा दाखल केला जात नाही, म्हणून आपण. मोबाईल टॉवर वर चढून आंदोलन करीत असल्याचे तोलानी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जो पर्यंत पोलीस गुलशन उदासी यांच्याविरोधात कारवाई करून त्यांना अटक करत नाही, तो पर्यंत आपण टॉवरवरून उतरणार नसल्याचा इशारा त्यांनी पोलिसांना दिला, मात्र पोलिसांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुरेश तोलानी यांना टॉवरवरून खाली उतरण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांची मनधरणी करून त्यांना खाली उतरविण्यात पोलिसांना यश आले. गेल्या अनेक दिवसांपासून तोलानी आणि उदासी यांच्यात आपसात वाद सुरू असल्याची देखील माहिती तोलानी यांनी दिली.