प्रतिनिधी, अमरावती: अमरावती शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून शहरात पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छता नाही,अमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठी मुले शहरात सर्वि कड़े घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार पसरत आहे असा आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टिच्या कार्यकर्त्यांनी करत थेट महानगर पालिकेत एक ट्रक कचरा नेवुन टाकला.
येत्या 8 दिवसात अमरावती शहर पूर्ण पने स्वछ न झाल्यास युवा स्वाभिमान पार्टी भ्रष्ट अधिकाऱ्या वर सुद्धा कचरा टाकायला मागे पुढे बघणार नाही व जो पर्यंत महानरक पलिके मधे कमीशन खोरी बंद होनार नाही तो पर्यंत युवा स्वाभिमान पार्टी स्वस्त बसणार नाही , सतत आंदोलन करणार असा इशारा युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिला
