प्रतिनिधी, इगतपुरी : इगतपुरी शहरात चोविसतास पाणी पुरवठा होणे बाबत नगर परिषदेने शासन स्तरावर ३८ कोटी रूपये ची योजना राबवुन ८० टक्के काम अद्याप पुर्ण केले मात्र शहर वासियांना या पाण्यासाठी पाणीपट्टी व मिटर भाडे दर जास्त प्रमाणात येणार असुन या बाबत नागरी हरकतीची जाहिरात प्रसिद्ध केल्याने नागरीकांसह शहरातील राजकीय संघटनांनी लेखी हरकती नोंदविल्या या बाबत नगरपरिषदेने नागरी बैठक घेत जनतेच्या मागण्या व पाणी ,मिटर , भाडेवाढ बाबत खुली चर्चा करीत जनतेचे मतांतर जाणुन घेतले . यात जनतेतुन अनेक रोष व भाडेवाढ हाेऊ नये यावर नगराध्यक्ष संजय इंदुलकर व नागरिकांमध्ये खडाजंगी झाली .अनेकांनी वाढीव पाणीबिल व मिटर भाडे न परवडणारे असल्याने शहरात रोजगार व्यावसाय नसुन जनतेला महागाईने होरपळले असतांना केवळ पाणी पिवुन पोट भरता येणार नाही तर दररोज किमान सकाळी व संध्याकाळी एक तास पाणी पुरवठा करावा आणि वाढीव बिल कमी करावे आदि मागण्या नागरीकांनी केल्या .
हरकती नोंदवित असताना मुख्याधिकारी यांनी प्रस्तावित पाणीपट्टीदर 50 टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात अर्ध्यापेक्षा जास्त दर नगराध्यक्ष यांनी मांडल्याने नागरिक संतप्त झाले व वादावादी झाली यानंतर नागरिकांचा वाढता रोष पाहता वाढीव दर कमी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार असल्याचे सांगत नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी बैठक आटोपती घेतली यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून जर प्रस्तावित दरवाढ कमी केली नाही तर गाव बंद करत रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सर्व पक्षांनी या प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढीला जोरदार विरोध केला आहे .
