प्रतिनिधी , यवतमाळ : यवतमाळ शहरात मुख्य बाजारपेठेतील अवैध बांधकामामुळे ईमरतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला. शहरात ठिकठिकाणी असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
सुनील भानारकर असे मृत युवकाचे नाव आहे. एका व्यापारी व रहिवासी इमारतीत घरगुती काम करीत असताना ईमारतीची कमकुवत गॅलरी कोसळली. या अपघातात सुनील हा ईमारतीवरून खाली कोसळला व मलब्यात दबून त्याचा दुर्दैवी अंत झाला. सात दिवसांपूर्वीच अतिक्रमण हटवावे अशी नोटीस व्यापाऱ्यांना दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच असुरक्षित इमारतींमध्ये नागरिकांनी राहू नये अशा सूचना देखील दिल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.
