जनतेज न्युज

यंदा परभणीत उरूस भरणार नाही.

प्रतिनिधी , कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही संपलेला नाही, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने परभणी जिल्हा महसूल प्रसासानाने यावर्षी हजरत सय्यद शाह तुराबुल हक यांचा देशभरात प्रसिद्ध असलेल्या ऊरूस यावर्षी रद्द केलाय. परभणीत
दरवर्षी मोठ्या प्रमाणात उरूस भरत असतो. राज्यासह देशभरातून येथे व्यापार्‍यांसह भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. उरूसानिमित्त धार्मीक, सामाजीक, सांस्कृतिक व इतर कार्यक्रमांची रेलचेलही मोठ्या प्रमाणात असते. मोठ्या प्रमाणात साजरा होत असलेल्या या उरूस मात्र जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यावर्षी रद्द केलाय .