जनतेज न्युज

ईडी चौकशीपूर्वी काय म्हणाले एकनाथ खडसे?

प्रतिनिधि , मुंबई : नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना आज ईडीने चौकशी संबंधित नोटीस बजावली आहे.त्यासाठी आज एकनाथ खडसे मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.

मात्र,ईडी चौकशीला जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना.यावेळी त्यांनी आपल्या तब्येतीबाबत आणि ईडी चौकशी बाबत आपली प्रतिक्रिया दिली.

‘थोडासा विकनेस जाणवत आहे.मात्र,माझी तब्येत ठीक आहे.आज मी ईडीसमोर हजर राहून ईडीच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तयार आहे’,अशी प्रतिक्रिया जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.