प्रतिनिधी, अकोला : अकोल्यात उड्डाणपुलाच्या नामकरणावरून राजकारण तापले आहे. वंचितच्या कार्यकर्त्यांनी उड्डानपुलाला ‘स्व. विनयकुमार पाराशर’ नाव दिलं होत. वाद चिघळू नये म्हणून पोलिसांनी तातडीने नामकरण केलेले फलक काढले होते . मात्र, पुन्हा वंचित आक्रमक झाली. वंचितने उड्डाणपुलांवर आंदोलन करत उद्घटनाची फितही कापली होती.मात्र, आज केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अकोला शहरातील या उड्डाणपुलांचे उद्घाटन होणार आहे. परंतू या उड्डाणपुलांचे उद्घाटन करू नये, असे आवाहन वंचितने गडकरी यांना केले होते . याचा निषेध म्हणून वंचितने उड्डाणपुलाला काळे झेंडे लावले आहेत. त्यामुळे आता पुलांच्या नावाच्या श्रेयावरून राजकारण अकोल्यात तापणार आहे. ज्यांनी आपल्यासाठी कुठलाच बलिदान दिलं नाही अशा व्यक्तीचे नाव उड्डाणपुलाला देत असल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे.
