प्रतिनिधी, जालना : ओबीसींना आरक्षण न मिळाल्यास माळी समाज रस्त्यावर उतरेल असा ईशारा माळी महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. जालन्यात हा ईशारा देण्यात आला.सध्या राज्यात राजकीय आणि सामाजिक स्थिती बिघडली असून राज्य सरकारने ओबीसींच्या आरक्षणासाठी कोणतेही पाऊले उचललेले नाहीत, असा आरोप माळी महासंघाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केला.राज्यात ओबीसी आरक्षणाची स्थिती बिघडल्याने ठाकरे यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन माळी समाज संपर्क अभियान सुरु केलं आहे या अभियानाच्या माध्यमातून ओबीसी समाजा बरोबरच माळी समाजात आरक्षणाविषयी जनजागृती केली जात असून आरक्षणाबाबत मार्गदर्शन केलं जातं आहे.त्यामुळे मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्याने ओबीसींची माहिती घेऊन ही माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करावी अशी मागणी ठाकरे यांनी केली मात्र राज्य सरकार पुन्हा ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत अपयशी ठरल्यास रस्त्यावर उतरू असा ईशारा ठाकरे यांनी दिला.
