प्रतिनिधी, औरंगाबाद : उन्हाळ्यात लागणारी तहान भागविण्यासाठी माठातील पाण्याची सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळेच उन्हाळ्याची चाहूल लागताच माठाची मागणी सुरू होते. या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथे गरिबाचा फ्रीज आला आहेत.
सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ परिसरातील अनेक असे कुटुंबाचा मूळ पारंपारिक व्यवसाय हा माती पासून माठ , रांजण व इतर साहित्य तयार करण्याचे काम अनेक वर्षा पासून करतात. आता सर्वत्र उन्हाची चाहूल लागली असल्याने थंड पाण्यासाठी सर्वत्र मातीच्या माठाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असल्याने ठीक ठिकाणी माठ बनविणारे कारागीर कामात मग्न असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. सध्या सिल्लोड शहरातील जळगाव बायपास रोडवर खास पिंपळगाव पेठ परिसरात तयार करण्यात आलेले माठ विक्रीसाठी उपलब्ध करू देण्यात आलेले आहेत. या माठाच्या आकारानुसार 150 ते 300 रुपये अशा त्यांच्या किमती आहेत. मागील वर्षी पेक्षा यंदा उन्हाची तीव्रता जरा जास्त असल्याच्या कारणावरून सिल्लोड येथील बाजार पेठेत पिंपळगाव पेठ परिसरात तयार झालेल्या माठाची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.
