जनतेज न्युज

शाळेने फी वाढ केल्याने पालकांनी घेतला आक्षेप ; तर चर्चेअंती पालकवर्ग समाधानी शाळा प्रशासनाची प्रतिक्रीया

प्रतिनिधी, बुलडाणा : बुलडाणा शहरातील नामांकित खासगी शाळेने फी वाढ केल्याने पालकांनी आक्षेप घेतला होता त्यामुळे बुलडाणा- चिखली रोड वर ठिय्या देत धरणे आंदोलन केले होते.बुलडाणा- चिखली रोड वरील सहकार विद्या मंदिर या इंग्लिश मीडियम स्कूल कायदा आणि नियमांचे उल्लंघन करून मनमानी पद्धतीने शैक्षणिक फी वाढवत केल्याचा आरोप केला आहे.तसेच अनाठायी फी वाढीच्या निर्णयाबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकांना शाळा प्रशासनाने अपमानास्पद वागणूक दिली.असा ही आरोप यावेळी पालकांनी केला आहे.तर सहकार विद्या मंदिर बुलढाणा यांची आज निवासी पालकांची बैठक ठेवण्यात आलेली होती. 2022-23 साठी फी वाढ  केली होती. या संदर्भात पालकांनी काही आक्षेप नोंदवले होते.त्या आक्षेपांचे पालकांसोबत व्यवस्थापन मंडळ यांची सकारात्मक चर्चा केली आणि या संपूर्ण प्रकरणावर तोडगा काढण्यात आलेला आहे.आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे..अशी प्रतिक्रिया शाळा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.