प्रतिनिधी, बुलडाणा : राज्यात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असतात. त्यामध्ये राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कुटुंब नियोजनाचा उपक्रमही राबवण्यात येत असतो. मात्र सरकारने या कुटुंब नियोजनाच्या किट मध्ये आशा वर्कर्स ना रबरी लिंग देऊन पेचात पाडलं आहे. प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे रबरी लिंग आशा वर्कर्सना देण्यात आले असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांकडुन ऑफ कॅमेरा सांगण्यात आलंय.मात्र हे रबरी लिंग घेऊन ग्रामीण भागातील महिला समोर जायचं कस या विवंचनेत ह्या आशा वर्कर्स असल्याचं पाहायला मिळालं.आम्ही काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन सरकार विरोधात बोलायला साफ नकार दिला.त्यामुळे तोंड दाबून बुक्यांचा मार या आशा वर्कर्स सहन करत आहेत. कुटुंब कल्याण योजना राबविण्याचे सरकारने आदेश दिले यावरून लक्षात येते की हे सरकार निर्लज्ज झालेला आहे. राज्य सरकारने यांनी महिलांची व आशा वर्कर यांची विटंबना केली आहे. या माध्यमातून महिलांच्या स्त्रीत्वाचा अपमान केला असून विनयभंग केला आहे. या राज्य सरकारवर व संबंधीतांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करावे.असं जर झालं नाही तर भारतीय जनता पार्टी कडून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे. असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी सांगितले आहे.
