जनतेज न्युज

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात घोषणा बाजी करत भारतीय जनता युवा मोर्चा ने विद्युत वितरण कंपनीवर काढला मोर्चा.

प्रतिनिधी , धुळे : कोरोना महामारी व लॉक डाऊन मुळे गेले चार महिने सामान्य माणूस आर्थिक संकटात सापडलेला असताना महावितरण कंपनीने दिलेल्या वाढीव वीज बिलांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वाढीव विज बिल आणि सतत च्या वीज पुरवठा खंडित होणारा विज पुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी धुळे शहरातील महानगरपालिका ते विज वितरण कंपनीच्या कार्यालयापर्यंत युवा मोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
लॉक डाऊन काळातील वाढीव वीजबिल रद्द करावे या मागणीसाठी धुळ्यात भाजप युवा मोर्चा तर्फे महावितरण कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोरोना काळात वाढीव वीज बिल आकारनाऱ्या महावितरण विभागासह ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. धुळे शहरातील साक्री रोडवरील विज वितरण विभागाच्या कार्यलयाबाहेर ठिय्या आंदोलन करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बाहेर जोरदार घोषणा बाजी करीत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
कोरोना महामारीने गेले ४ ते ५ महिने सामान्य माणूस आधीच मेटाकुटीस आलेला असताना कुडाळतील नागरिकांना जास्तीची आलेली बिले ही कंबरडे मोडणारी आहेत. त्यामुळे आपत्तीच्या काळात नागरिकांसमोर ही एक वेगळीच आपत्ती आली आहे. त्यात वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने धुळेकर नागरिक चांगेल हैराण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ह्या विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त करत मोर्चाचे आयोजन केले होते.