जनतेज न्युज

ऊस दराचा प्रश्न घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे सातारा महामार्गावर केला चक्काजाम

प्रतिनिधी, सातारा : राज्यामध्ये ऊस दराचा प्रश्न अत्यंत गंभीर होत असताना कोल्हापूर नंतर सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी सातारा पुणे महामार्ग आज सकाळी दहा वाजता रोखला व आनेवाडी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करत ऊस दराचा प्रश्न निकाली काढा अन्यथा हे आंदोलन आणखीन तीव्र केले जाईल असा इशारा आज आंदोलनाच्या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे आज सकाळी दहा वाजता आणेवाडी टोल नाक्यावर पुण्याच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक शेतकरी संघटनेने रोखली व शासनाचा निषेध करत साखर सम्राटांचा निषेध करत जोरदार निदर्शने केली त्यामुळे आणीबाणी टोल नाक्यापासून सातारच्या दिशेने 10 किलोमीटर लांब वाहनाच्या रांगा लागून राहिल्या होता सध्या राज्यात पूजनाचा प्रश्न अत्यंत गंभीर होत असतानाच कारखाने दसऱ्याच्या नंतर जोमाने सुरू झाले आहेत यातच कारखान्याच्या दिशेने जाणारी वाहतूक जागोजागी स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून रोखले जात आहे यातच सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी महामार्ग चक्काजाम करून आंदोलन केले आहे.